वज्रेश्वरी, ता. २० (बातमीदार) : तानसा नदीपात्रात पाणी पिण्यासाठी नदीवर गेलेली चार जनावरे मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकली. या जाळ्यातून बाहेर पडता न आल्याने पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
गणेशपुरी येथील शेतकरी नरेश पाटील यांच्या कुटुंबाचा दुग्ध व्यवसायावरच उदरनिर्वाह चालतो. शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी म्हशी तानसा नदीमध्ये पाणी पिण्यासाठी गेल्या होत्या. त्यातील तीन म्हशी आणि एका वासराचा माशांच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला आहे. एकाच वेळी चार जनावरे दगावल्याने त्यांच्या उत्पन्नाचा मोठा आधार हिरावला गेला असून, कुटुंबासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान, नदीपात्रात मासेमारीसाठी जाळी लावताना त्याची योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. बहुतांश ठिकाणी रात्री जाळी लावून पहाटे ती काढून घेतली जात असल्याचे सांगण्यात येते, मात्र जाळी नदीपात्रात राहिल्यास जनावरे किंवा इतर प्राणी त्यात अडकून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
गुन्हा दाखल करून भरपाई द्यावी!
या घटनेप्रकरणी तानसा नदीमध्ये जाळे लावणाऱ्या संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर अधिकृत गुन्हा दाखल करावा, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई त्याच्याकडून मिळावी, अशी मागणी शेतकरी नरेश पाटील यांनी केली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार जनावरांचा मृत्यू पाण्यात गुदमरल्याने झाल्याची माहिती मिळत असल्याचेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.