मुंबई

ट्रक-टेम्पोंच्या आडून अमली पदार्थांचा धंदा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : एकीकडे देशभर ‘नशामुक्त भारत’ अभियानाचा जागर सुरू असताना दुसरीकडे ठाणे शहरात अमली पदार्थांच्या गैरव्यवहारासह हुक्का पार्लरचा छुपा धंदा सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पोलिसांच्या कारवाईला चकवा देत काही ठिकाणी हुक्का पार्लर सुरू असल्याचे, तर मोकळ्या जागा आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक-टेम्पोंच्या आडून अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याचे नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकारांनी खळबळ उडाली असून, संबंधित ठिकाणांची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तातडीच्या कारवाईचा आग्रह धरणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.

‘जनसेवकाचा जनसंवाद’ या १२९ व्या कार्यक्रमात नागरिकांनी व्यसनांच्या वाढत्या विळख्याबाबत संताप व्यक्त केला. ठाण्यात काही वर्षांपासून जागरूक नागरिकांना सोबत घेऊन ‘हुक्का पार्लरमुक्त ठाणे’ ही चळवळ उभारण्यात आली आहे. या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी हुक्का पार्लर बंद झाले असले तरी कारवाईनंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू आहेत. शहरातील काही मोकळ्या जागांवर तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रक-टेम्पोंच्या आडून अमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू आहे. अशा ठिकाणांची माहिती पोलिसांकडे सोपविण्यात आली असून, या प्रकरणात केवळ वरवरची कारवाई न करता संबंधित संपूर्ण साखळीवर कठोर कारवाईची मागणी पोलिस आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. शहरातील तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे केळकर यांनी सांगितले.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT