मुंबई

नारिवलीतील विस्कळित बससेवेचा शिक्षणावर परिणाम

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबईतील १४ गावांमध्ये गणरायाच्या दर्शनादरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी नारिवली गावातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांनी डोंबिवलीला महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाताना भेडसावणाऱ्या परिवहन सेवेशी संबंधित अडचणी आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील १४ गावांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी डोंबिवलीतील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी ये-जा करतात. नारिवलीसह परिसरातील गावांमधून डोंबिवलीकडे जाण्यासाठी महापालिकेच्या बस सेवेचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर वापर करतात, मात्र बस वेळापत्रकानुसार उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागतो. बस उशिराने आल्यामुळे महाविद्यालयात पोहोचण्यास विलंब होतो आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही होत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली. तसेच सकाळच्या वेळेत बसफेऱ्या पुरेशा नसल्याने प्रवासाचे नियोजन करणे कठीण जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रशासनासोबत चर्चा करणार
विद्यार्थिनींच्या या अडचणी आमदार मोरे यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित प्रश्न असल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. यासंदर्भात केडीएमसी परिवहन विभागाशी चर्चा करून नारिवली-डोंबिवली मार्गावरील बस सेवेतील अडचणी दूर करण्याचे तसेच आवश्यकतेनुसार फेऱ्या वाढविण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : सरकारने कितीही चांगली कामगिरी केली, तरी त्यावर टीका करणे हेच विरोधी पक्षाचे काम- खासदार उपेंद्र कुशवाह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT