मुंबई

ठाणेकरांनाे, ‘क्लिक’ करताना सावधान!

CD

पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : मोबाईलवर आलेली एक लिंक, केवायसीच्या नावाखाली आलेला फोन किंवा ऑनलाइन व्यवहारातील निष्काळजी... आणि क्षणार्धात खात्यातील पैसे गायब! ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आकडेवारीतून सायबर फसवणुकीचे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या वर्षात विविध आर्थिक फसवणुकीच्या आठ हजार ६३१ व्यवहारांत ठाणेकरांना तब्बल चार कोटी ५३ लाख ९५ हजारांचा फटका बसला; मात्र पोलिसांच्या मनी रिस्टोरेशन मॉड्यूलमुळे (एमआरएम) एक कोटी २५ लाख ६४ हजार रुपये परत मिळवण्यात यश आले आहे.

सायबर चोरट्यांनी केवळ मोठ्या रकमेवरच डल्ला मारलेला नाही, तर असंख्य छोट्या-छोट्या व्यवहारांतून नागरिकांना गंडा घातला आहे. फसवणुकीची रक्कम हाती पडताच ती अनेक खात्यांमध्ये फिरवली जाते. त्यामुळे पोलिस आणि बँकांना तातडीने कारवाई करावी लागते. याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ‘मनी रिस्टोरेशन मॉड्यूल’च्या माध्यमातून बँकांशी समन्वय साधत संशयित व्यवहारांवर कारवाई केली.

झोन-३ ‘सायबर हॉटस्पॉट’
झोन-३ मध्ये सर्वाधिक दोन हजार ४४१ व्यवहारांतून एक कोटी २३ लाख ८८ हजारांची फसवणूक झाली. यापैकी ३२ लाख नऊ हजार ९५२ रुपये परत मिळवण्यात आले. झोन-५ मध्ये सर्वाधिक दोन हजार ७१५ व्यवहार झाले असून, नागरिकांना एक कोटी १३ लाख २३ हजारांचा फटका बसला. या झोनमध्ये ३४ लाख ४५ हजार रुपये परत मिळाले.

सायबर विभागाची शंभर टक्के कारवाई
सायबर विभागाकडे ७९८ व्यवहारांतून ३५ लाख २६ हजारांची फसवणूक झाल्याची नोंद आहे. त्यापैकी १० लाख १६ हजार रुपये परत मिळाले आहेत. या तक्रारींवर १०० टक्के कारवाई झाल्याचे आकडेवारीत नमूद आहे. एकूण तक्रारींच्या ९४.०६ टक्के तक्रारींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

अजूनही २.४५ कोटींची रक्कम प्रक्रियेत...
फसवणुकीतील चार हजार २१८ व्यवहारांशी संबंधित दोन कोटी ४५ लाख ७२ हजार ३२२ रुपयांची रक्कम विविध प्रक्रियेत आहे. त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी गप्प न बसता तातडीने पोलिसांकडे धाव घेणे महत्त्वाचे ठरत आहे. फसवणुकीनंतरचा प्रत्येक मिनिट पैशांच्या परताव्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

झोननिहाय आकडेवारी
विभाग व्यवहार फसवणुकीची रक्कम परत मिळालेली रक्कम परताव्याची टक्केवारी
झोन-१ १,२७७ ७७.३० लाख २६.२२ लाख ३३.९२
झोन-२ २६७ २६.५६ लाख ०६.२६ लाख २३.५९
झोन-३ २,४४१ १.२३ कोटी ३२.०९ लाख २५.९१
झोन-४ १,१३३ ७७.७० लाख १६.४४ लाख २१.१६
झोन-५ २,७१५ १.१३ कोटी ३४.४५ लाख ३०.४३
सायबर ७९८ ३५.२६ लाख १०.१६ लाख २८.८१
एकूण ८,६३१ ४.५३ कोटी १.२५ कोटी २७.६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT