मुंबई

महाप्रसादासाठी व्यावसायिक गॅसचे बंधन

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : गणेशोत्सवात छोट्या-मोठ्या सार्वजनिक मंडळांपासून घरगुती गणपतींपर्यंत अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते, मात्र मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करताना घरगुती गॅस सिलिंडरचा वापर उत्सवाच्या या आनंदाला एका क्षणात गालबोट लावू शकतो. त्यामुळे महाप्रसादासाठी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होऊ नये आणि आगीच्या दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी ठाणे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. गणेश मंडळांना मंडप, ध्वनी किंवा महाप्रसादाची परवानगी देताना ‘केवळ व्यावसायिक सिलिंडर वापरणे बंधनकारक’ ही अट परवानगीपत्रातच नमूद केली जाणार आहे. महाप्रसादाच्या आयोजनापूर्वीच मंडळांना याबाबत माहिती देण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस आणि पुरवठा विभागाला देण्यात आले आहेत.

महाप्रसादासाठी मोठ्या भांड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक केला जातो. त्यासाठी घरगुती सिलिंडरचा वापर केल्यास त्याची क्षमता, बर्नर आणि गॅसच्या दाबाचा विचार करता धोका निर्माण होऊ शकतो. घरगुती सिलिंडरचा सार्वजनिक किंवा व्यावसायिक वापर आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अपघात झाल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचीही शक्यता आहे.

आनंदाचा बेरंग नको
उत्सवाचा आनंद अबाधित राहण्यासाठी स्वयंपाकाच्या ठिकाणी सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये. मोठ्या प्रमाणातील स्वयंपाकासाठी घरगुती सिलिंडर धोकादायक ठरू शकतो, असे ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे संस्थापक नितीन सोळंके यांनी सांगितले.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT