मुंबई

‘आयआयटीमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखा’

CD

घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) : गेल्या वर्षभरात आणि त्यापूर्वीही मुंबई ‘आयआयटी’मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध कारणाने आत्महत्या केल्या आहेत. हे सत्र अद्याप थांबलेले नसून, नुकतीच पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी आयआयटी अधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा घटना थांबल्या पाहिजेत, अशी तंबी दिली आहे. या वेळी गेल्या वर्षभरातील विद्यार्थी आत्महत्यांबाबत ‘मनविसे’ने संचालकांना जाब विचारला.

१८ सप्टेंबरला आयआयटी पवई येथील बीटेक द्वितीय वर्षातील विद्यार्थी साहिल वाकोडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना परीक्षेदरम्यान मोबाईल व चॅट जीपीटीच्या वापराबाबत घडल्यानंतर काही तासांत तो आपल्या वसतिगृहातील खोलीत मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर आयआयटी मुंबईने आपल्या प्राथमिक निवेदनात त्याच्याविरुद्ध त्या वेळी कोणतीही औपचारिक शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे, मात्र ही घटना संतापजनक आहे, असेही या चर्चेदरम्यान मानविसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले.

या वेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळात संघटनेचे संतोष गांगुर्डे, प्रमोद मांढरे, नितीन ननावरे, प्रशांत परुळेकर, गोविंद जोईल, राहुल कदम, वैभव देवकर, प्रवीण नाडर, आकाश सोनवणे यांच्यासह आयआयटी पवईचे संचालक डॉ. शिरीष केदारे, सहसंचालक डॉ. गुड्डी यांची भेट घेऊन संस्थेच्या प्रशासनाला थेट जाब विचारला, असेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT