मुंबई

वांद्र्याच्या ‘सम्राट’ने कागदापासून साकारली १९ फूट मूर्ती

CD

वांद्र्याच्या ‘सम्राट’ने कागदापासून साकारली १९ फूट मूर्ती
गणरायाच्या भक्तीसह निसर्गाचीही काळजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : पीओपी मूर्तीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा नैसर्गिक जलस्त्रोतांवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा वसा हाती घेतला आहे. यंदाचे मंडळाचे हे २३ वे वर्ष आहे. यावर्षी मंडळाने कागदापासून १९ फूटी गणरायची मूर्ती साकारली आहे. संपूर्णतः कागदाच्या सहाय्याने ही सुबक आणि मनमोहक मूर्ती साकारण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष यांनी दिली.
२०१७ च्या मुंबईवर आलेल्या पुरानंतर मंडळाने गणेशोत्सवाची संपूर्ण संकल्पनाच पर्यावरणपूरक करण्याचा निर्णय घेतल्याचे वांद्र्याचा सम्राट युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष रवी रमेश परब यांनी सांगितले. मूर्ती उंच जरी असली तरी कागदापासून तयार केली असल्याने विसर्जनानंतर अवघ्या २० मिनिटात ती पाण्यात विरघते, अशी माहितीही परब यांनी दिली.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देणारा उत्सव व्हावा, हा मंडळाचा प्रयत्न आहे. ‘भक्तीबरोबर निसर्गाचीही काळजी’ हा संदेश या गणेशोत्सवाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

शेषनागावर विराजमान श्रीगणेश
पार्ल्यातील मूर्तिकार राजेश मयेकर यांनी ही सुबक आणि भव्य मूर्ती साकारली आहे. शेषनागावर विराजमान गणेशाचे रूप, मूर्तीची उंची आणि कलाकुसर हे विशेष आकर्षण ठरत आहे. यामध्ये १६ फूट गणपती तर वरतीं तीन फूट शेषनाग आहे. विशेष म्हणजे हा शेषनागही फोमपासून तयार केला असून त्याचाही पुनर्वापर केला जाऊ शकतो. मूर्तीप्रमाणेच मंडपातील सजावटीतही पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देण्यात आले आहे. मखराची आरास आणि सजावटीचे काम मंडळाचे आर्टिस्ट तानाजी जाधव यांनी एकट्याने पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून उभारण्यात आला आहे.

सामाजिक एकोपा
या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे सामाजिक एकोपा. हे मंडळ वांद्र्यातील मुस्लिमबहूल परिसरात आहे. तसे असले तरीही येथील मुस्लिम बांधवही या मंडळात भेट देतात आणि गणपतीच्या कामाला हातभर लावतात. गणपतीच्या आरतीला उपस्थित राहतात. या मंडळात हिंदू-मुस्लिम सामाजिक एकोप्याची दखल अनेकांनी घेतल्याचेही परब सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : सरकारने कितीही चांगली कामगिरी केली, तरी त्यावर टीका करणे हेच विरोधी पक्षाचे काम- खासदार उपेंद्र कुशवाह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT