‘आदित्य ठाकरेंवरील आरोपांचे पुरावे द्या’
वरुण सरदेसाईंचे आव्हान; नरेंद्र पवारांच्या अटकेवरूनही सवाल
कल्याण, ता. २० (वार्ताहर) : दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी त्यासंबंधी ठोस पुरावे समोर आणावेत, असे आव्हान ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी शनिवारी दिले. पुरावे समोर आल्यास त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावेत. पुरावे असतील तर ते समोर आणावेत, त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असे सरदेसाई म्हणाले. ‘मातोश्री’ हे मोठे नाव असून, मातोश्रीवर गेल्याने प्रसिद्धी मिळते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात अलीकडे घडामोडी सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी दिशा सालियन यांना आपण कधी भेटलो किंवा ओळखत नसल्याचे म्हटले आहे.
--------
‘नरेंद्र पवारांना अटक कधी?’
या वेळी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचाही सरदेसाई यांनी उल्लेख केला. विरोधी पक्षातील नेत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून त्यावर टीका केली जाते आणि त्यानंतर माध्यमांमध्ये चर्चा सुरू होते, मात्र नरेंद्र पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
--------
‘शिंदे गट-भाजपमध्ये कायम वाद’
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय परिस्थितीवरही सरदेसाई यांनी भाष्य केले. महापालिकेत अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नियुक्तीबाबतही ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरही त्यांनी टीका केली. दोन्ही पक्षांमध्ये भांडण सुरू आहे; मग नागरिकांची कामे कधी होणार, असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.