टीईटी पेपरफुटी प्रकरण
दोन फरार आरोपींना अटक
दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर कारवाई; आरोपींची संख्या १८ वर
भिवंडी, ता. २० (वार्ताहर) : टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर तपास पथकाने दोन फरार आरोपींना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १८ झाली आहे. प्रकाश मिसाळ (रा. बीड) आणि अशोककुमार बाबूलाल शाव (रा. पटना) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मिसाळ याला बीडमधून, तर शाव याला दिल्लीमधून अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना रविवारी (ता. २०) भिवंडी न्यायालयात हजर केले असता, २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील यापूर्वी अटक आरोपी कपिल दहिया हा प्रकाश मिसाळला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. एका हॉटेलमध्ये झालेल्या या भेटीत टीईटी परीक्षेच्या पेपरच्या खरेदी-विक्रीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशोककुमार शाव हा सोलापूर येथून अटक करण्यात आलेल्या प्रकाश पवारच्या संपर्कात होता. पटना येथील शावच्या राहत्या घरातून १४९ परीक्षार्थींच्या नावांची यादी जप्त करण्यात आली आहे. या यादीतील व्यक्तींशी आरोपींचे आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त विजय मराठे यांनी सांगितले. दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी मिळाल्याने तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे मराठे यांनी सांगितले. आरोपींचे वकील ॲड. शैलेश गायकवाड यांनीही न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.