डिजिटल मार्केटिंगसाठी डीएस ग्रुपकडून ‘डीकोड २.०’
मुंबई, ता. २० : धारमपाल सत्यपाल समूहाने (डीएस ग्रुप) डब्ल्यूपीपी मीडिया आणि एमआयसीए (मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, अहमदाबाद) यांच्या सहकार्याने ‘डीकोड २.० – द गाइड टू डिजिटल मार्केटिंग’ या डिजिटल मार्केटिंग मार्गदर्शकाचे अनावरण केले. डिजिटल मार्केटिंगमधील वेगाने होणारे बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर लक्षात घेऊन ही आवृत्ती तयार करण्यात आली आहे.
कॉर्पोरेट व एजन्सी मार्केटिंग टीम, डिजिटल व्यावसायिक, मीडिया प्लॅनर्स, मीडिया बायर्स, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि वरिष्ठ मार्केटिंग व्यावसायिकांसाठी हे मार्गदर्शक उपयुक्त ठरणार असून, ते खुले स्वरूपात उपलब्ध केले जाणार आहे. ‘डीकोड २.०’मध्ये एआयचा स्वतंत्र विषय म्हणून विचार न करता सर्च, पेड मीडिया, परफॉर्मन्स मार्केटिंग, कंटेंट आणि क्रिएटिव्ह अशा डिजिटल मार्केटिंगच्या विविध क्षेत्रांत त्याचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावर भर देण्यात आला आहे. डीएस ग्रुप व डब्ल्यूपीपी मीडियाचा उद्योगातील अनुभव आणि एमआयसीएचा शैक्षणिक दृष्टिकोन यांची सांगड घालण्यात आली आहे. मार्गदर्शकातील मॉड्यूल्स अधिक सुलभ व व्यावहारिक करण्यात आले असून, ‘पेड, ओन्ड अँड अर्न्ड’ या चौकटीतही बदल करण्यात आले आहेत.
डीएस ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव जैन यांनी एआयमुळे मार्केटिंगची विचार, निर्मिती, ग्राहकांशी संवाद आणि परिणाम मोजण्याची पद्धत बदलत असल्याचे सांगितले. डब्ल्यूपीपी मीडिया दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार आणि एमआयसीएच्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जया देओरास देशमुख यांनीही उद्योगातील अनुभव, तंत्रज्ञान आणि मानवी सर्जनशीलतेच्या संगमाचे महत्त्व अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.