मुंबई

भिवंडी-मुंबई लोकलची प्रतीक्षा कायम

CD

भिवंडी, ता. २० (बातमीदार) : भिवंडी-कल्याण मेट्रो-५ प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असतानाच भिवंडी रोड ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस थेट लोकल सेवा सुरू करण्याची मागणीही अद्याप प्रलंबित आहे. तत्कालीन खासदार कपिल पाटील आणि खासदार सुरेश म्हात्रे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप निर्णय झाला नसल्याने भिवंडीकरांना थेट मुंबई लोकलची प्रतीक्षा कायम आहे. या मागणीसाठी आता प्रवासी नागरिक संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

कापड उद्योगाची नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरातून मुंबई, ठाणे आणि इतर भागांत जाण्यासाठी प्रवाशांना प्रामुख्याने एसटी, शहर बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. एसटी बस वेळेवर उपलब्ध न झाल्यास नागरिकांना खासगी वाहनांचा खर्च करावा लागतो. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या शहर बससेवा उपलब्ध असल्या, तरी महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे त्यांचा प्रवास वेळखाऊ आणि अनिश्चित होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

सध्या भिवंडी रोड स्थानकातून वसई-दिवा लोकल सेवा सुरू आहे. मुंबईच्या दिशेने जाणारे नोकरदार, व्यापारी आणि विद्यार्थी कोपर स्थानकात उतरून पुढील प्रवासासाठी मुंबई व उपनगरांतील लोकलचा आधार घेतात. मात्र, भिवंडी परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या गृहसंकुलांमुळे लोकसंख्येत वाढ होत असून त्याचा परिणाम वसई-दिवा लोकलवरील प्रवासी भारावर होत आहे. भिवंडीहून थेट मुंबई लोकल सुरू झाल्यास नोकरदार, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. इतर भागांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा केला जात असताना भिवंडीच्या थेट लोकल सेवेबाबतही केंद्र व राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापारी आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात पुढाकार घ्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT