मुंबई

४३ वर्षांच्या लढ्याला यश; माजी बीएमटीसी कामगारांना १० लाखांची मदत

CD

४३ वर्षांच्या लढ्याला यश
माजी बीएमटीसी कामगारांना १० लाखांची मदत
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : सिडकोच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेतील माजी कामगारांच्या ४३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आर्थिक लढ्याला अखेर यश आले आहे. सिडकोकडून पात्र माजी कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा मोबदला देण्यात येत असून, आतापर्यंत ५०० कामगारांना धनादेशांचे वाटप केले आहे. उर्वरित कामगारांनाही लवकरच मोबदला मिळणार असल्याची माहिती माजी कामगार जगन्नाथ पाटील यांनी दिली.
नवी मुंबईतील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोने बीएमटीसी परिवहन सेवा सुरू केली, मात्र काही वर्षांतच या सेवेचे आर्थिक गणित बिघडले. वाढता खर्च आणि अडचणी यामुळे अखेर सिडकोला ही सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामुळे अनेक कामगारांवर आर्थिक संकट ओढवले. सिडकोने कामगारांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा, या मागणीसाठी माजी कामगारांनी सातत्याने पाठपुरावा केला. मागील ४३ वर्षांत विविध पातळ्यांवर आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करण्यात आला, मात्र निर्णय होत नसल्याने कामगारांची प्रतीक्षा कायम होती. अखेर सिडकोने या मागणीची दखल घेत पात्र कामगारांना १० लाख रुपये अथवा एक व्यावसायिक गाळा देण्याचा ठराव करण्यात आला. हा ठराव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. शासनाकडून या ठरावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT