मुंबई

रिअल इस्टेट व्यवसाय विकास कौशल्य कार्यशाळा

CD

बेलापूर, ता. २१ : रिअल इस्टेट क्षेत्रातील विक्री कौशल्ये, ग्राहक व्यवस्थापन आणि प्रभावी वाटाघाटी तंत्र विकसित करण्यासाठी रिअल इस्टेट सेल्स मास्टरक्लासचे आयोजन २६ सप्टेंबरला नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. प्रसिद्ध प्रशिक्षक अभिजित चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी ही ऑफलाइन कार्यशाळा रिअल इस्टेट सल्लागार, विक्री व्यावसायिक, विकसक आणि चॅनेल पार्टनरसाठी उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यशाळेत आधुनिक बांधकाम क्षेत्रातील विक्री तंत्र, २०२६ मधील भारतीय मालमत्ता खरेदीदारांची मानसिकता, लीड क्वालिफिकेशन आणि व्हॅल्यू-बेस्ड सेलिंग यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच साईट व्हिजिटचे प्रभावी नियोजन, ग्राहकांच्या हरकतींचे निराकरण, भावनिक विक्री तंत्र आणि व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण करण्याच्या पद्धती शिकविल्या जाणार आहेत.

याशिवाय सीआरएम आणि आधुनिक सेल्स टेक्नॉलॉजीचा वापर, प्रगत वाटाघाटी कौशल्ये, कठीण ग्राहकांशी व्यवहार करण्याची तंत्रे, नैतिक वाटाघाटी आणि डील क्लोजिंग याबाबतही मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणात रोल प्ले, प्रात्यक्षिक उपक्रम आणि केस स्टडीजचा समावेश असल्याने सहभागींना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे.

ही कार्यशाळा विक्रीतील रूपांतरण दर वाढवणे, ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण करणे आणि अधिक यशस्वी व्यवहार पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क : ८४८४८११५४४
ठिकाण : ‘सकाळ भवन’, सीबीडी बेलापूर, प्लॉट क्र. ४२ बी, सेक्टर ११, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT