मुंबई

४० लाखांच्या लुटीचा २४ तासांत छडा!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : बँकेच्या दिशेने ४० लाखांची रोकड घेऊन निघालेल्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत रस्त्यात स्कुटीला लाथ मारून रोकड असलेली बॅग हिसकावून पोबारा केला. कल्याणमध्ये घडलेल्या या जबरी चोरीचा २४ तासांत कल्याण गुन्हे शाखेने छडा लावला. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या ३४ लाख ८३ हजारांच्या रकमेसह गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल असा एकूण ३६ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती आज (ता. २१) ठाण्यात पत्रकार परिषदेत ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

उल्हासनगर येथील क्रांती फूड एजन्सीचे दोन कर्मचारी १५ सप्टेंबरला दुपारी कंपनीचे ४० लाख रुपये बँकेच्या कल्याण पश्चिम शाखेत जमा करण्यासाठी स्कुटीवरून निघाले होते. सहजानंद चौकाकडून लालचौकीच्या दिशेने जात असताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार जणांनी त्यांचा पाठलाग केला. संधी साधून संशयितांनी स्कुटीला लाथ मारून दोन्ही कर्मचाऱ्यांना खाली पाडले. त्यानंतर मारहाण करून रोकड असलेली बॅग हिसकावून ते पसार झाले. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

कल्याण गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत समीर अख्तर शेख (वय २८), आफताब अस्लम खान (२५), शहानवाज गफार हसन अन्सारी (३६), सोहेब युन्नूस शेख (२४), मुझाहिद अन्वर खान (२४) आणि शाहीद इसाक शेख (१९) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, या टोळीतील इतर काही बाबींचाही तपास सुरू आहे.

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

Asian Games, Cricket Live Streaming: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकणार टीम इंडिया? श्रीलंकेविरुद्ध रंगणार फायनल; कुठे पाहाणार?

वृद्धाश्रमात ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू, मुलगा म्हणाला, अंत्यसंस्काराला वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT