मुंबई

बेकायदा फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हा

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावाजवळील तात्पुरत्या विद्युत मनोऱ्यावर परवानगी न घेता भव्य फलक लावल्याने तो कोसळल्याचा प्रकार कल्याण पूर्व परिसरात घडला होता. या फलकामुळे पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान, तसेच विद्रूपीकरण झाल्याचा आरोप करत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

खडेगोळवली येथील औंधाराम नगर परिसरात नागरिकांना मूर्ती विसर्जनाची सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने कृत्रिम तलाव उभारला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी विसर्जनासाठी प्रकाश व्यवस्था करण्यासाठी महापालिकेच्या एम. जी. इलेक्ट्रिकल या ठेकेदाराने तात्पुरता विद्युत मनोरा उभारला होता, मात्र या मनोऱ्यावर पालिका, तसेच वाहतूक विभागाची परवानगी न घेता शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मधुर उमेश म्हात्रे यांचे नाव, छायाचित्र तसेच अन्य कार्यकर्त्यांची छायाचित्रे असलेला सुमारे १० बाय १२ फुटांचा फलक लावण्यात आला होता.

हा विद्युत मनोरा १४ सप्टेंबरला दुपारी अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच ‘ड’ प्रभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनीही पाहणी केली. त्यावेळी मनोऱ्यावर संबंधित फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. फलकाच्या वजनामुळे तात्पुरता विद्युत मनोरा कोसळल्याचे पाहणीत आढळून आल्याचे तक्रारीत नमूद आहे. ‘ड’ प्रभागाचे अधीक्षक नितीन चौधरी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.

फलक लावणाऱ्याचा शोध सुरू
फलकावर पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या मंजुरीचा क्रमांकही नव्हता. फलक कोणी लावला, याचा शोध घेण्यात आला; मात्र संबंधित व्यक्तीची माहिती मिळाली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT