मुंबई

परतीच्या प्रवासासाठी एसटी ठरली चाकरमान्यांचा आधार

CD

परतीच्या प्रवासात एसटीला चाकरमान्यांची पसंती
गणेशोत्सवानंतर मुंबई, पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांची बस स्थानकांवर गर्दी
पोयनाड, ता. २२ (बातमीदार) : पाच दिवस गावी गणेशोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर चाकरमान्यांनी आता नोकरी-व्यवसायानिमित्त शहरांकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. या प्रवासासाठी एसटी बसला मोठी पसंती मिळत असून, अलिबागसह पोयनाड परिसरातील बस स्थानकांवर नुकतीच प्रवाशांची गर्दी दिसून आली.
गौरी-गणपती विसर्जन झाल्यानंतर कार्लेखिंड, तिनवीरा, पेझारी, पोयनाड आणि शहाबाज येथील बस स्थानकांवर मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली. काही चाकरमान्यांनी गर्दी टाळण्यासाठी पूर्वीच मुंबई व ठाण्याकडे परतण्यास प्राधान्य दिले. अलिबागहून पनवेलकडे जाणाऱ्या एसटी बस प्रवाशांनी भरून जात होत्या. पोयनाड येथून होणारे एसटी आरक्षणही पूर्ण झाले होते.
अलिबाग-मुंबई, अलिबाग-पुणे, मुरूड-मुंबई, अलिबाग-अक्कलकोट, अलिबाग-पंढरपूर, अलिबाग-शिर्डी, मुरूड-बोरिवली, रेवदंडा-बोरिवली, आग्राव-बोरिवली, अलिबाग-सातारा यांसह शिहू-परळ आणि सांबरी-परळ या गाड्यांनाही गर्दी झाली.

महिलांसह ज्येष्ठांचा एसटीकडे कल
महिलांना अर्ध्या तिकिटाची आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा असल्याने या घटकांकडून एसटीला प्राधान्य दिले जात आहे. सुरक्षित आणि तुलनेने सोयीचा प्रवास तसेच विविध मार्गांवरील थेट बस सेवा यामुळे गणेशोत्सवानंतरच्या परतीच्या प्रवासात एसटी चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरली.

Files, images, and data analysis are unavailable until usage resets at 6:59 PM. Continue chatting with text only, or upgrade for more access.
Try Plus free

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT