दिघा विभाग कार्यालयाची जुनी इमारत बनली गर्दुल्ल्यांचा अड्डा
वाशी, ता. २१ (बातमीदार) ः पालिकेच्या दिघा परिसरातील तलावाजवळ असणाऱ्या जुन्या विभाग कार्यालयाची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. नूतनीकरणाचे काम अर्धवट राहिल्याने ही वास्तू सध्या गर्दुल्ले व मद्यापींचा मुख्य अड्डा बनली आहे. या ठिकाणी अनैतिक प्रकार घडत असून, येथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही इमारत तातडीने जमीनदोस्त करावी किंवा सुरक्षा भिंत घालावी, अशी जोरदार मागणी नगरसेविका अपर्णा गवते यांनी केली आहे.
पालिकेच्या दिघा विभाग कार्यालयाची इमारत ही ग्रामपंचायत काळापासून अस्तित्वात होती. ही इमारत धोकादायक झाल्यामुळे पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिघा विभाग कार्यालयांचे नूतनीकरण आणि पुर्नबांधणी करण्याच्या अनुषंगाने मान्यता दिली होती. त्यानुसार ५० लाख रुपये खर्चून नूतनीकरणाचे काम सुरू केले, मात्र नूतनीकरण कामांच्या वेळी इमारत धोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर नव्याने इमारत बांधण्याचे पालिकेने ठरवले आहे, तर पालिका ही एमआयडीसीकडे दिघा विभाग कार्यालयासाठी भूखंड मिळावा यासाठी मागणी करत आहे, पण भूखंड मिळत नसल्याने यांचे काम रखडले आहे, पण सद्यःस्थितीत या विभाग कार्यालयामध्ये गुर्दल्ल्यांनी आपले अड्डा केला आहे. यासंदर्भात शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
दिघा विभाग कार्यालयाच्या जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये मद्यपी तसेच गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. पालिकेला ही इमारत बांधायची नसेल, तर त्यांनी इमारत जमीनदोस्त करावी. ज्या पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेवरील पुनर्विकासासाठी जीआर आणला आहे, त्याच पद्धतीने एमआयडीसीकडून पालिकेने भूखंड विकत घेऊन येथे विभाग कार्यालयाची इमारत उभारावी.
- नवीन गवते, माजी स्थायी समिती सभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.