मुंबई

प्रीपेड रिक्षाचा श्रीगणेशा

CD

ठाणे शहर, ता. २१ : रेल्वे स्थानक परिसरातील भाड्यावरून होणारे वाद, रिक्षा समस्यांची दखल घेत, अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रीपेड रिक्षा सेवेचा अखेर श्रीगणेशा करण्यात आला. आता प्रवाशांकडून निश्चित भाडे आकारले जाणार असून, प्रवास सुरू करण्यापूर्वीच भाड्याची माहिती मिळणार आहे. पहिल्या दिवशी शंभरहून अधिक रिक्षाचालक, मालकांनी या सेवेसाठी नोंदणी केली. त्यामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीलादेखील चाप बसणार आहे. ही सेवा प्रशासनाने लवकर सुरू करावी, याकरिता ‘सकाळ’नेदेखील भूमिका उचलून धरली होती. हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला असून, आता रिक्षाचालकांनी दिवसभर कमावलेला गल्ला आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षांच्या रांगा, प्रवाशांशी होणारे वाद आणि भाड्याबाबतची अनिश्चितता दूर करण्यासाठी स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्यवस्था सुरू करण्यात आली. प्रीपेड रिक्षा स्टँड आणि कक्षाच्या उद्‍घाटनावेळी आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मारुती सावंत, संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.

सकाळपासून दिवसभर रिक्षा व्यवसाय करून मिळवलेले उत्पन्न दिवसअखेरीस थेट चालकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे रोख रक्कम हाताळण्याची गरज कमी होऊन रिक्षाचालकाच्या रोजच्या कमाईचे अधिक सुरक्षित व्यवस्थापन होणार आहे. याचा त्यांच्या कुटुंबालाही फायदा होईल, असे आमदार डावखरे यांनी सांगितले. प्रीपेड रिक्षा सेवेला तातडीने मान्यता देऊन ठाणेकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

दीड वर्षापासून पाठपुरावा
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील संघर्ष कमी करण्यासाठी प्रीपेड रिक्षा सेवेचा प्रस्ताव गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पुढे नेण्यात येत होता. महाराष्ट्रात अशा प्रकारची व्यवस्था यापूर्वी उपलब्ध नसल्याने तिच्या अंमलबजावणीदरम्यान विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी आल्या. रिक्षाचालकांची दैनंदिन कमाई लक्षात घेऊन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

प्रवासापूर्वीच भाडे निश्चित
प्रीपेड सेवेत प्रवाशाला रिक्षात बसण्यापूर्वीच प्रवासाचे निश्चित भाडे समजणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या शेवटी भाड्यावरून होणारी घासाघीस आणि त्यातून निर्माण होणारे वाद टाळण्यास मदत होणार आहे. स्थानकाबाहेर रिक्षांच्या रांगा आणि प्रवाशांच्या सोयीचे नियोजन करण्यासाठीही ही व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे. या सेवेचे नियोजन आणि व्यवस्थापन ‘सिटीफ्लो’च्या माध्यमातून केले जाणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यातील व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुसूत्र करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रिक्षा सेवेबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. त्यावर अनेकदा बैठका झाल्या. रिक्षाचालकांनीदेखील या उपक्रमाला पाठिंबा देऊन ही सेवा लवकरात लवकर सुरू करावी, याकरिता आरटीओकडे पाठपुरावा केला होता. पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक चालकांनी नोंदणी करून भरघोस प्रतिसाद दिला आहे.
- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

Asian Games, Cricket Live Streaming: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकणार टीम इंडिया? श्रीलंकेविरुद्ध रंगणार फायनल; कुठे पाहाणार?

वृद्धाश्रमात ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू, मुलगा म्हणाला, अंत्यसंस्काराला वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT