मुंबई

सोयाबीनच्या १४७ गोण्या लंपास

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : इंदूरहून पनवेलला पोहोचविण्यासाठी कंटेनर ट्रकमधून पाठविण्यात आलेल्या सोयाबीनच्या १४७ गोणी गायब झाल्याचा प्रकार खारेगाव टोलनाक्याजवळ समोर आला आहे. २० किलोच्या या गोणींची एकूण किंमत दोन लाख आठ हजार असून, ट्रकचालकाने मालाचा अपहार केल्याचा आरोप ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकाने केला आहे. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार उमानाथ मिश्रा (वय ४५, रा. दापोडी, माणकोली) हे दापोडी येथील मधुकर रोडलाइन्समध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीचा कंटेनर ट्रक (एमएच ०४ एलवाय ९५०९) चालक मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद नसरुद्दीन अन्सारी याच्याकडे सोयाबीनच्या ४५० गोणी इंदूरहून पनवेलमधील रिलायन्स रिटेल लिमिटेड येथे पोहोचविण्याची जबाबदारी दिली होती. १४ सप्टेंबरला सायंकाळी ट्रक इंदूरहून रवाना झाला, मात्र १७ सप्टेंबरपर्यंत ट्रक पनवेलला पोहोचला नाही. कंपनीकडून ट्रकचे लोकेशन तपासले असता तो खारेगाव टोलनाक्याजवळ उभा असल्याचे समोर आले. मिश्रा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ट्रकचा चालक आढळला नाही. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद होता. ट्रकच्या कंटेनरला लॉक नसल्याचेही निदर्शनास आले.

कंपनीच्या वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर कंटेनर उघडून पाहणी करण्यात आली. त्या वेळी सोयाबीनच्या गोणी कमी असल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी मजुरांच्या मदतीने मोजणी केली असता, ४५० ऐवजी केवळ ३०३ गोणी आढळल्या. त्यामुळे १४७ गोणी गायब असल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

Asian Games, Cricket Live Streaming: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकणार टीम इंडिया? श्रीलंकेविरुद्ध रंगणार फायनल; कुठे पाहाणार?

वृद्धाश्रमात ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू, मुलगा म्हणाला, अंत्यसंस्काराला वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT