मुंबई

''सोनखारच्या राजा''समोर अवतरली भव्य ''संतसृष्टी''

CD

सोनखारच्या राजासमोर अवतरली ‘संतसृष्टी’
सानपाड्यात भक्ती आणि प्रबोधनाचा अनोखा संगम
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : सानपाड्यातील मूळ सोनखारच्या भूमीत विराजमान झालेल्या ‘सोनखारचा राजा’च्या मंडपात यंदा भक्ती आणि प्रबोधनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाचे हे ३०वे सुवर्णमयी वर्ष असून, या औचित्यावर गणरायासमोर संतसृष्टीचा जिवंत, भावपूर्ण आणि नेत्रदीपक देखावा उभारला आहे.
महाराष्ट्राच्या पावनभूमीला लाभलेली संतांची परंपरा आणि त्यांनी मानवकल्याणासाठी दिलेली शिकवण आजच्या आधुनिक काळात पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील थोर संतांनी भक्तीच्या माध्यमातून जोडलेला समाज, त्यांचे तत्त्वज्ञान आणि दिलेल्या शिकवणीची माहिती चलचित्र व आकर्षक देखाव्याच्या माध्यमातून भाविकांसमोर मांडण्यात आली आहे. सानपाड्यासह संपूर्ण नवी मुंबईतून येणारे हजारो गणेशभक्त या संतसृष्टीच्या दर्शनाने भारावून जात आहेत. माजी उपमहापौर दशरथ भगत हे या मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक असून, नगरसेवक निशांत करसन भगत हे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत. यंदाचे कार्याध्यक्ष हेमंत देसाई यांच्यासह समाजसेवक संदीप भगत, नगरसेविका प्रीती संदीप भगत, फशीबाई भगत, वैजयंती भगत आणि रुपाली भगत हे सर्व कार्यवाहक उत्सवाच्या यशस्वितेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या संपूर्ण सोहळ्याला श्रीबुद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे मोलाचे योगदान लाभले आहे.

सामाजिक बांंधिलकीचे भान
उत्सवादरम्यान आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलत प्रमाणपत्रांची नोंदणी व वाटप, ज्येष्ठ महिला व पुरुषांसाठी रंगणारी उत्साही कराओके गायन स्पर्धा आणि लहान मुलांच्या क्रीडा व कलागुणांना वाव देणारे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

पर्यावरणाचा समतोल
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ‘सोनखारचा राजा’ची नऊ फुटी श्रीगणेश मूर्ती पूर्णपणे कागदाच्या लगद्यापासून बनवली आहे. विसर्जन मिरवणूकही पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि पूर्णपणे गुलालविरहित वातावरणात काढली जाते. अनंत चतुर्दशीला वाशी गाव येथील जागृतेश्वर शिवमंदिर तलावात गणरायाचे विसर्जन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT