सुभाष टेकडीतील हत्येचा उलगडा
जगदाळे हत्येप्रकरणी कारवाई; पाच आरोपी गजाआड
उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात पूर्ववैमनस्यातून रोहित जगदाळे या तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच हत्या करणाऱ्या टोळीवर कारवाई करीत पाच आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिस आणि उल्हासनगर गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली.
सुभाष टेकडी परिसरात पूर्ववैमनस्यातून रोहित जगदाळे या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस आणि उल्हासनगर गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करीत पाच आरोपींना अटक केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम बनकर, अतिश मनोहर, अनिकेत खरात ऊर्फ टॉम, साहिल म्हस्के आणि प्रतीक क्षेत्रे यांना अटक केली. शुक्रवारी (ता. १८) मध्यरात्री रोहितवर काही जणांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्याला बेदम मारहाण करून पेव्हर ब्लॉक, चाकूने वार करण्यात आले होते. जखमी रोहितला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येमागील नेमके कारण, पूर्ववैमनस्याचे स्वरूप तसेच या गुन्ह्यातील आणखी तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.