मुंबई

एक इंचाच्या गणरायाचे आकर्षण

CD

एक इंचाच्या गणरायाचे आकर्षण
कुर्ल्यातील श्री ज्ञानदीप मित्र मंडळाचा अनोखा उत्सव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : कुर्ला पश्चिमेतील श्री ज्ञानदीप मित्र मंडळ, कुर्ला स्थानकचा राजा यांचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा अनोखे आकर्षण ठरले आहे. मंडळाच्या ३९व्या वर्षानिमित्त यंदा अवघ्या एक इंचाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शेषनागाच्या भव्य फण्याखाली विराजमान असलेल्या या छोटेखानी गणरायाचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘लिटिल मास्टर शेषनाग गणेशा’ अशी या मूर्तीची ओळख असून, आकाराने अवघी एक इंचाची असली तरी भक्ती आणि महिमा अनंत असल्याचा संदेश मंडळाने दिला आहे. गणेशभक्तांनी कुटुंबासह या अनोख्या गणरायाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. नवी कंपाउंड, हरियानावाला लेन, स्थानक रोड, कुर्ला पश्चिम येथे गणेशभक्तांना या विशेष गणरायाचे दर्शन घेता येणार आहे.

यंदा भक्तांसाठी काहीतरी वेगळं आणि अविस्मरणीय साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवघ्या एक इंचाच्या गणरायाचे हे अनोखे रूप म्हणजे आकाराने छोटे, पण भक्ती आणि श्रद्धेने विशाल असे श्रींचे दर्शन आहे. गणेशभक्तांनी कुटुंबासह या लिटिल मास्टर गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा.
– ईश्वर अहिरे, अध्यक्ष, श्री ज्ञानदीप मित्र

अवघ्या एक इंचाच्या श्री गणरायाचे शेषनागाच्या फण्याखालील हे रूप भाविकांसाठी निश्चितच आकर्षण ठरणार आहे. मूर्ती लहान असली तरी श्रींचे महत्त्व आणि भक्तीची भावना अनंत आहे. प्रत्येक गणेशभक्ताने कुटुंबासह या लिटिल मास्टर गणरायाचे दर्शन घ्यावे.
– धनंजय दळवी, कार्याध्यक्ष, श्री ज्ञानदीप मित्र मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT