फळ आणि कांदा-बटाटा मार्केटमध्ये विनाअनुमती झाडांची छाटणी
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) ः एपीएमसी फळ आणि कांदा-बटाटा मार्केट परिसरात रात्रीच्या अंधारात विनाअनुमती झाडांची बेकायदेशीर छाटणी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांनी चौकशीचे आदेश दिले असून, एपीएमसी पोलिस ठाणे आणि नवी मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तुर्भे-वाशी लिंक मार्गावर कांदा-बटाटा मार्केट परिसरात आठपेक्षा अधिक झाडांची रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात छाटणी करण्यात आली आहे. तसेच, एपीएमसी सिग्नलजवळ फळ बाजारात देखील काही झाडांची छाटणी करण्यात आली आहे. यावेळी झाडांची छाटणी करण्याचे नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. नियमानुसार झाडाचा शेंडा कधीही छाटू नये असे आहे; परंतु झाड उंचावर वाढत असल्याने या झाडांचा शेंडाच कापण्यात आला आहे. तसेच, चारही बाजूंनी काही झाडे पूर्णपणे बोडकी करण्यात आली आहेत. यासंदर्भात अज्ञाताने बाजार समितीच्या माध्यमातून विनाअनुमती बाजार आवारात प्रवेश करून झाडांची बेकायदेशीर छाटणी केल्याची तक्रार एपीएमसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच, नवी मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाकडेदेखील बाजार समितीने कळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.