मुंबई

चिंचोटी पुलावरून भाजप-बहुआ आमनेसामने

CD

विरार, ता. २२ (बातमीदार) : वसई पूर्वेतील चिंचोटी येथील प्रस्तावित पुलाच्या कामावरून भाजप आणि बविआमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना भगली यांचे पती शरद भगली यांच्यामुळे पुलाचे काम रखडल्याचा आरोप आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी केला आहे. या आरोपाला नगरसेविका ज्योत्स्ना भगली यांनी प्रत्युत्तर देत पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी आम्हीच सातत्याने पाठपुरावा केला असून, आमदारांचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिंचोटी पुलाचा प्रश्न आता राजकीय वादाचा विषय बनला आहे.

चिंचोटी येथील जुना पूल सध्या जीर्णावस्थेत असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. परिसरातील औद्योगिक वसाहतींचा विस्तार झाल्याने वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्यातच पावसाळ्यात चिंचोटी धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांकडूनही या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे वसई आणि चिंचोटी परिसराला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलाचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. गणेशोत्सवानिमित्त चिंचोटी परिसरातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी पुलाच्या रखडलेल्या कामावरून शरद भगली यांच्यावर निशाणा साधला. पुलाच्या कामाचे श्रेय स्वतःला मिळावे, यासाठी या कामात अडथळे आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आरोप-प्रत्यारोप तीव्र होणार
‘आम्ही पुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आमदारांनी गणरायांसमोर तरी खोटे बोलायला नको होते,’ असा टोला भगली यांनी लगावला. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT