मुंबई

हरिहरेश्वरच्या विकासाला पर्यटनाची जोड द्या

CD

हरिहरेश्वरच्या विकासाला पर्यटनाची जोड द्या
खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन
श्रीवर्धन, ता. २२ (वार्ताहर) : हरिहरेश्वर येथील धार्मिक पर्यटनाला व्यापक स्वरूप देतानाच स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी केले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सभामंडप व रस्त्याच्या विकासकामांच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
हरिहरेश्वरला राज्यातील तसेच देशभरातील भाविक व पर्यटक भेट देत असल्याने त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. धार्मिक पर्यटनासोबत आधुनिक पर्यटनाची जोड देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
निसर्ग चक्रीवादळात हरिहरेश्वर देवस्थानचा सभामंडप उद्ध्वस्त झाला होता. त्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची दखल घेत नव्याने सभामंडप उभारण्याचा निर्धार केला होता. त्यांचे हे स्वप्न आता साकार झाले आहे. सभामंडप, रस्ते, सेल्फी पॉइंट इत्यादी सुविधांमुळे भाविक, पर्यटक व स्थानिक नागरिकांची सोय होणार आहे. विकासकामे करताना धार्मिक महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि स्थानिक गरजा यांचा समतोल राखण्याची गरज असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
या वेळी हरिहरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वामन बोडस, विश्वस्त जितेंद्र गुरव, सखाराम जाधव, निनाद गुरव, सचिव-खजिनदार सिद्धेश पोवार, माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

चौकट :
ओळख व्यापक करण्याचा प्रयत्न
हरिहरेश्वर देवस्थान व तीर्थक्षेत्र परिसराचे धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गसौंदर्य अधोरेखित करणारा रंगीत छायाचित्रांचा अल्बम तयार करण्यात आला आहे. समुद्रकिनारा, डोंगररांगा, मंदिर परिसर आणि तीर्थक्षेत्राचे विविध पैलू या अल्बममधून मांडण्यात आले असून, त्याद्वारे हरिहरेश्वरची ओळख व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

SCROLL FOR NEXT