मुंबई

डंपर वाहतुकीचा धोका

CD

डम्पर वाहतुकीचा धोका
उलवे-जेएनपीटी मार्गावर वाळू-खडी गळती; वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
उलवे, ता. २२ (बातमीदार) : उलवे ते जेएनपीटी महामार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाळू व खडी वाहून नेणाऱ्या डम्परमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. डम्परमधून वाळू उडणे तसेच खडी आणि बांधकाम साहित्य रस्त्यावर गळत असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देऊन नियमांचे पालन सुनिश्चित करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
उलवे, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने दररोज नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी डम्परची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. काही डम्परमधून वाहतूक केली जाणारी वाळू व खडी योग्य प्रकारे झाकलेली नसल्याने मागून येणाऱ्या वाहनांवर ती उडत असल्याचे चित्र दिसते. वाळू डोळ्यांत गेल्याने दुचाकीस्वारांना अचानक वाहनाचा वेग कमी करावा लागतो. त्याचप्रमाणे रस्त्यावर गळणारी खडी चाकाखाली आल्यास वाहनाचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते.
या मार्गावर अवजड वाहनांची नियमित वाहतूक होत असल्याने रस्त्यावर पडणारे बांधकाम साहित्य इतर वाहनांसाठी अडथळा ठरत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच डम्परमधून साहित्य वाहून नेताना आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नियमित तपासणीची गरज
सर्वसामान्य वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे ओव्हरलोड डम्पर, अपुऱ्या ताडपत्रीचा वापर आणि रस्त्यावर वाळू-खडी गळण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहतुकीचीही संबंधित विभागांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेला जात आहे का, डम्पर योग्य प्रकारे झाकले आहेत का, तसेच वाहतुकीदरम्यान साहित्य रस्त्यावर पडत नाही ना, याबाबत तपासणी करण्याची मागणी होत आहे. अपघात झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी संभाव्य धोके वेळीच दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT