मुंबई

स्मार्ट कार्ड सक्तीला स्थगित

CD

स्मार्ट कार्ड सक्तीला स्थगिती
ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांना ३० सप्टेंबरपर्यंत दिलासा; रायगडमध्ये आतापर्यंत ४० टक्केच नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २२ : एनसीएमसी (स्मार्ट कार्ड) प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि वाढलेल्या प्रवासीसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या गैरसोयींची दखल घेत एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी स्मार्ट कार्डची अनिवार्यता ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे या कालावधीत एनसीएमसी कार्ड नसलेल्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलतीच्या दरात एसटीचे तिकीट मिळणार आहे, मात्र ज्यांच्याकडे सक्रिय एनसीएमसी कार्ड आहे, अशा लाभार्थ्यांना कार्डच्या आधारेच सवलतीचे तिकीट देण्याच्या सूचना महामंडळाने केल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील आठ एसटी आगारांमध्ये प्रत्येकी दोन केंद्रांवर कार्ड नोंदणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे, मात्र आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ४० टक्के लाभार्थ्यांचीच नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
एनसीएमसी प्रणालीवर एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवाशांचा भार आल्याने सर्व्हरवर ताण निर्माण होत होता. त्यामुळे तिकीट काढताना तांत्रिक अडचणी येत होत्या. काही प्रवाशांना सवलतीच्या तिकिटाऐवजी पूर्ण भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारीही महामंडळाकडे प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर महामंडळाच्या वाहतूक विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत स्मार्ट कार्डची सक्ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
रायगड वाहतूक नियंत्रक सुहास चौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वाहक, चालक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांनाही निर्णयाची माहिती देण्याचे निर्देश आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.

४० टक्केच नोंदणी
रायगड जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी प्रत्येकी दोन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, मात्र आतापर्यंत केवळ ४० टक्के लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे उर्वरित ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना कार्ड मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. नोंदणीचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सक्रिय कार्डधारकांना सक्ती
स्मार्ट कार्डची सार्वत्रिक सक्ती ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली असली, तरी सक्रिय एनसीएमसी कार्ड असलेल्या लाभार्थ्यांसाठी वेगळ्या सूचना आहेत. अशा प्रवाशांना त्यांच्या कार्डच्या आधारेच सवलतीचे तिकीट देण्याचे स्पष्ट निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. त्यामुळे कार्ड सक्रिय असलेल्या प्रवाशांनी प्रवास करताना एनसीएमसी कार्ड सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे सवलतीच्या तिकिटापासून वंचित राहणाऱ्या इतर पात्र प्रवाशांना मात्र ३० सप्टेंबरपर्यंत पूर्वीप्रमाणे सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT