मुंबई

हरित ऊर्जेसाठी ‘एमईआरसी’चा सुधारित आराखडा

CD

हरित ऊर्जेसाठी ‘एमईआरसी’चा सुधारित आराखडा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : राज्यात नवीकरणीय (हरित) ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक प्रणालींचा वेगाने विस्तार व्हावा, यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) कंबर कसली आहे. त्यानुसार सुधारित नियामक आराखडा प्रस्तावित केला असून, त्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत.
राज्यात सौरऊर्जा, छतावरील सौर पॅनेल, कृषी वाहिनी सौरऊर्जीकरणात मोठी वाढ होत आहे. शहरी केंद्रे आणि डेटा सेंटर्सकडून २४ तास नवीकरणीय विजेची मागणी नोंदली जात आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० सारख्या उपक्रमांतून २०३० पर्यंत एकूण विजेच्या मागणीपैकी ५० टक्के नवीकरणीय स्रोतांमधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षभरातच नवीकरणीय निर्मितीत २५ टक्के वाढ झाली असून, त्यात सौरऊर्जेत ३६ टक्के आणि पवन ऊर्जेत १२ टक्के वाढ झाली आहे. तसेच मार्च २०२६ मध्ये जाहीर झालेल्या महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण २०३५-३६ नुसार २०३६ पर्यंत ६५ टक्के वीज नवीकरणीय स्रोतांमधून आणि किमान १० टक्के बॅटरी स्टोरेज व पंप हायड्रोसारख्या साठवणुकीतून पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी वीज आयोगाने सुधारित नियामक आराखडा प्रस्तावित केला आहे. हा आराखडा http://www.merc.gov.in वर उपलब्ध असून, १२ ऑक्टोबरपर्यंत सूचना आणि १५ ऑक्टोबरपर्यंत प्रति-निवेदने सादर करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT