डोंबिवली जिमखान्याच्या
अध्यक्षपदी राहुल दामले
नव्या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : शहरातील क्रीडा क्षेत्राला येथील डोंबिवली जिमखान्याने गेल्या अनेक वर्षांपासून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या जिमखान्याच्या अध्यक्षपदी राहुल दामले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या वेळी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अनेक वर्षांनंतर प्रथमच कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीत राहुल दामले यांची अध्यक्षपदी, अनिल भोईर यांची उपाध्यक्षपदी, माधव सिंग यांची सचिवपदी आणि ज्येष्ठ सनदी लेखापाल सुहास आंबेकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक श्रीपाद कुलकर्णी आणि शीतल पाटील यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे.
दामले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपमहापौर तसेच भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे डोंबिवली जिमखान्याच्या आगामी क्रीडा उपक्रमांकडे शहरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. कार्यकारिणीत नव्या सदस्यांना स्थान मिळाल्याने नागरिक तसेच विविध क्रीडा संस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक खेळाडूंना प्रशिक्षणाचे व्यासपीठ
विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उद्योजक मधुकर चक्रदेव, बापूसाहेब मोकाशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी जिमखान्याच्या उभारणीत पुढाकार घेतला होता. जिमखान्याची स्थापना होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी ठाणे, मुंबई किंवा नवी मुंबई येथे जावे लागत होते. मात्र जिमखान्यात विविध क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यानंतर स्थानिक खेळाडूंना आपल्या शहरातच प्रशिक्षणाची संधी मिळू लागली. बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांतील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून येथे क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.