मुंबई

घोडबंदरवर कारची दुभाजकाला धडक

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : गणपती विसर्जनानंतर घरी परतत असताना ओलाचालकाने भरधाव वाहन चालवून दुभाजकाला धडक दिल्याने पोलिस निरीक्षक महिलेसह त्यांच्या दोन मुलांना आणि भाच्याला दुखापत झाली. घोडबंदर रोडवरील एम. जी. हेक्टर शोरूमसमोर झालेल्या या अपघातात पोलिस निरीक्षक कल्पना जाधव (४६) आणि त्यांची १३ वर्षीय मुलगी अथर्वा यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
जाधव या रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) म्हणून कार्यरत आहेत. २६ सप्टेंबरला त्या अथर्वा, मुलगा विघ्नेश (११) आणि बहिणीचा मुलगा ध्रुव दाडेकर (१०) यांच्यासह पोलिस ठाण्याच्या गणपती विसर्जनासाठी गेल्या होत्या. विसर्जनानंतर त्या घरी परतत असताना मध्यरात्री १२.५१ वाजता त्यांनी ऑनलाइन कॅब बुक केली. मात्र, पहाटे १.२० वाजता घोडबंदर रोडवरील एम. जी. हेक्टर शोरूमसमोर चालकाने वाहन भरधाव चालवून दुभाजकाला धडक दिली. अपघातात जाधव यांच्या पायाला दुखापत झाली. तर अथर्वाच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर असून डोक्यालाही दुखापत झाली. विघ्नेशच्या पायाला आणि खांद्याला दुखापत झाली. सीटबेल्ट लावलेला असल्याने ध्रुवच्या छातीला आणि पोटाला दुखापत झाली. तक्रारीवरून चालकाविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT