मुंबई

स्वीकृत सदस्यांची यादी गुलदस्त्यात

CD

भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : भिवंडी पालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी २८ सप्टेंबरला विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ३७ उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, अर्ज दाखल होऊन तीन दिवस उलटूनही पालिका प्रशासनाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजी आहे. निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची मागणी होत आहे.
भिवंडी पालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या यंदा पाचवरून नऊ करण्यात आली आहे. संख्याबळानुसार काँग्रेसला तीन, भाजपला दोन, तर शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), समाजवादी पक्ष आणि कोणार्क विकास आघाडीला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. भाजपकडून शहराध्यक्ष रवी सावंत आणि सुगंधा टावरे, शिवसेना (शिंदे गट)कडून संजय काबुकर, तर कोणार्क विकास आघाडीकडून मयूर पाटील यांची नावे निश्चित मानली जात आहेत. मात्र, काँग्रेससह समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने उमेदवारांच्या नावांबाबत अद्याप एकमत झालेले नसल्याची चर्चा आहे. सर्व उमेदवारी अर्ज पालिका उपायुक्त सपना वसावा यांच्याकडे दाखल आहेत. उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत अद्याप निर्देश नसल्याने ती जाहीर करण्यात आलेली नाही, असे वसावा यांनी स्पष्ट केले.
निवड प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे. राजकीय दबावामुळे यादी जाहीर केली जात नसेल, तर ही बाब योग्य नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी यांनी दिली. काँग्रेसकडून आपण इच्छुक असून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे; मात्र इतर कोणाचे अर्ज दाखल झाले आहेत, हे समजणे गरजेचे आहे, असे आर्शी आजमी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT