मुंबई

महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नांतून स्थानिक कामगारांना मिळाली ग्रॅज्युईटी!

CD

अडीचशे कामगारांच्या संघर्षाला यश
महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याने ग्रॅच्युइटी जमा
उलवे, ता. २ : मे. पंजाब कॉनवेअर कंपनीतील सुमारे अडीचशे स्थानिक कामगारांचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला ग्रॅच्युइटीचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्रॅच्युइटी मिळाली असून, कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे. गॅड लॉजिस्टिक्स प्रा. लि. या कंत्राटाअंतर्गत द्रोणागिरी येथील मे. पंजाब कॉनवेअर कंपनीत सुमारे २५० कामगार गेली १७ वर्षे कार्यरत होते. ३१ जानेवारी २०२२ रोजी गॅड लॉजिस्टिक्स कंत्राटदाराची मुदत संपल्यानंतर मे. रायगड लॉजिस्टिक या नवीन कंत्राटदाराला काम देण्यात आले, मात्र १७ वर्षे अविरत सेवा बजावूनही कामगारांना नियमानुसार मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीपासून वंचित राहावे लागले होते. आपल्या हक्काच्या न्यायासाठी कामगारांनी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्र घरत यांची भेट घेतली. महेंद्र घरत यांनी कंपनी व्यवस्थापनासोबत सातत्याने बैठका घेऊन सकारात्मक आणि आक्रमक पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, कामगारांच्या खात्यात ग्रॅच्युइटीची रक्कम जमा झाली आहे. गुरुवारी (ता. १) कामगारांनी महेंद्र घरत यांच्या सुखकर्ता या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत आभार मानले. महेंद्र घरत यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच आम्हाला गणपती पावला आणि ग्रॅच्युइटी मिळाली, असे कामगारांनी म्हटले आहे. या वेळी न्यू मेरिटाइम ॲण्ड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, कामगार प्रतिनिधी आशीष तांडेल, भूपेंद्र केणी, उमेश भोईर, विजय पाटील, जयवंत डाकी, महेश पाटील, रुपेश पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT