मुंबई

पादचारी पुलाच्या धोकादायक शिड्या

CD

पादचारी पुलाच्या धोकादायक शिड्या
महामार्ग विभागाच्या सुरक्षाविषयक अभ्यासावर प्रश्न; नागरिकांच्या विरोधानंतर काम थांबले
पोलादपूर, ता. २ (बातमीदार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर शहरात नागरिकांच्या मागणीनंतर पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, पुलावर जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या शिड्यांची धोकादायक आणि अरुंद रचना पाहून नागरिकांनी विरोध केल्याने हे काम थांबवण्यात आले आहे. शिड्यांची रचना बदलून सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर तसेच विद्या मंदिर हायस्कूलकडे जाण्यासाठी नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागतो. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन नागरिकांकडून पादचारी पुलाची मागणी करण्यात आली होती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या ठिकाणी पुलाचे काम सुरू झाले; मात्र शिड्यांच्या रचनेवर नागरिकांनी आक्षेप घेतल्याने कामाला ब्रेक लागला आहे.
पादचारी पुलाची उभारणी करताना परिसरातील शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींच्या वापराचा विचार करण्यात आला होता का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. शिड्यांची रुंदी, चढण्याची पद्धत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची रचना योग्य आहे का, याबाबत तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारा पूलच धोकादायक ठरू नये, यासाठी काम पूर्ण करण्यापूर्वी संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी आहे.
पुलाचा वापर सुरू झाल्यानंतर शिड्यांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे केवळ काम थांबवून प्रश्न सुटणार नसून, शिड्यांची सुरक्षित रचना करूनच पुढील काम करण्यात यावे, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. महामार्ग विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक बदल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

सुरक्षित रचनेची गरज :
पादचारी पुलाचा उद्देशच नागरिकांना वाहतुकीच्या धोक्यापासून सुरक्षितपणे महामार्ग ओलांडता यावा हा आहे. त्यामुळे पुलावर चढण्यासाठी असलेल्या शिड्यांची रचना सर्व वयोगटांना सहज वापरता येईल, अशी असणे आवश्यक आहे. विशेषतः शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन शिड्यांची रुंदी, उतार आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

कामापूर्वी तांत्रिक तपासणी :
नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर काम थांबले आहे. मात्र, पुढील काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाने शिड्यांची तांत्रिक व सुरक्षाविषयक तपासणी करणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी दूर केल्यानंतरच काम पुढे नेण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

कोट
पादचारी पुलाच्या कामाचा अजब कारभार समोर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून शिड्या उभारणे गरजेचे असताना धोकादायक शिड्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कामाला आमचा विरोध आहे. संबंधित विभागाने नागरिकांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून योग्य ती उपाययोजना करावी.
- सचिन मेहता, स्थानिक नागरिक

दरम्यान, याप्रकरणी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले असून लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया विभागाकडून देण्यात आली.

-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT