संचमान्यतेच्या मुदतीत वाढ
हजारो शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई, ता. २ ः राज्यातील शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची मुदत आता १० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. संचमान्यतेसंदर्भात राज्यातील १,८९५ शाळांमध्ये विविध त्रुटी आढळल्याने सुमारे ९०,८४३ विद्यार्थी प्रभावित होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या ३० सप्टेंबरच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
विद्यार्थ्यांची पटनोंदणी करताना माहितीमध्ये त्रुटी राहिल्यास संबंधित विद्यार्थ्यांची नोंद संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही अथवा केवळ योग्य माहिती असलेले विद्यार्थीच विचारात घेतले जातील, असे माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. संचमान्यता वेळेत पूर्ण न झाल्यास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह प्रशासकीय बाबींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची विद्यार्थिसंख्या शालार्थ प्रणालीवर पूर्णपणे अद्ययावत झाली आहे, त्यांची संचमान्यता तातडीने मंजूर करण्याची मागणी शिक्षण विकास मंचाने केली आहे. विद्यार्थिसंख्या आवश्यक प्रमाणात असूनही केवळ संचमान्यता प्रलंबित असल्याने राज्यातील हजारो शिक्षकांचे वेतन थांबले असल्याचा दावा मंचाने केला आहे.
...
तातडीने मंजूर करा!
संपूर्ण राज्यात सुमारे ३० ते ३५ टक्के शिक्षकांचे वेतन थांबले असल्याचे शिक्षण विकास मंचाचे मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने घेऊन पुरेशी विद्यार्थिसंख्या असलेल्या शाळांची संचमान्यता तातडीने मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
...
ज्या शाळांची विद्यार्थिसंख्या शालार्थ प्रणालीवर पूर्णपणे अद्ययावत झाली आहे, अशा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता तातडीने मंजूर केल्यास संचमान्यतेअभावी थांबलेले शिक्षकांचे वेतन पूर्ववत होण्यास मदत होईल. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
-डॉ. माधव सूर्यवंशी, मुख्य समन्वयक, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.