वज्रेश्वरी, ता. २ (बातमीदार) : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत १ ऑक्टोबरला ‘महाश्रमदान दिना’निमित्त भिवंडी तालुक्यातील कारिवली ग्रामपंचायतीत स्वच्छता व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्या, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. महा श्रमदान दिनानिमित्त ग्रामपंचायत परिसर, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छतेसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचा सेवा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंडित राठोड, भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर, विस्तार अधिकारी (पंचायत) राजू भोसले यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
निरोगी गाव निर्मितीचा संकल्प
श्रमदान व स्वच्छता उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत परिसर, रस्ते, चौक, शाळा, पाणीपुरवठा स्रोत परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या भावनेतून नागरिकांनी सहभाग नोंदवत स्वच्छ, सुंदर व निरोगी गाव निर्मितीचा संकल्प केला. स्वच्छता ही एका दिवसाची मोहीम नसून ती सातत्याने जपण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.