मुंबई

वडोलच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावा

CD

अंबरनाथ, ता. २ (वार्ताहर) : पश्चिमेकडील वडोल गावात मुस्लिम समाजासाठी मंजूर केलेल्या एक एकर दफनभूमीची हद्द निश्चित करून जागेला तातडीने संरक्षक भिंत उभारावी, तसेच ही जागा प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक अब्दुल शेख यांनी अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. नगर परिषदेच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ४३च्या चर्चेदरम्यान त्यांनी हा प्रलंबित प्रश्न उपस्थित केला.

वडोल गावात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून तीन एकर जागा मंजूर करून घेतली आहे. या जागेत तिन्ही समाजांसाठी प्रत्येकी एक एकर जागा नियोजित केली आहे. यापैकी हिंदू समाजाच्या स्मशानभूमीचे काम सुरू असून, ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीचे कामही सुरू करण्यात येणार आहे. मात्र, मुस्लिम समाजासाठी मंजूर झालेल्या जागेचा अद्याप विकास झालेला नसल्याने ती दफनभूमीसाठी प्रत्यक्ष वापरात आलेली नाही. त्यामुळे या जागेची हद्द निश्चित करून संपूर्ण परिसराला संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी शेख यांनी केली, याकडे शेख यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने सुरू करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि नगराध्यक्षा तेजश्री विश्वजीत करंजुले यांना पाठविण्यात आल्या आहेत.


पोलिस बंदोबस्तात काम करणार
कामादरम्यान स्थानिक पातळीवर कोणताही अडथळा किंवा विरोध झाल्यास आवश्यक पोलिस बंदोबस्त घेऊन काम पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता राजेश तडवी यांनी संबंधित जागा नगर परिषदेची असल्याचे स्पष्ट केले. तसेच, आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्तात संरक्षक भिंतीचे काम करता येईल, अशी माहिती सभागृहात देण्यात आली. सभाध्यक्षा, बांधकाम सभापती आणि स्थानिक नगरसेवक शैलेश भोईर यांनीही मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे शेख यांनी सांगितले.

अंबरनाथ : वडोल येथील मुस्लिम दफनभूमीसाठी मंजूर करण्यात आलेली जागा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT