मुंबई

शासकीय सेवा नागरिकांच्या दारी

CD

शासकीय सेवा नागरिकांच्या दारी
विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली
भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ‘सेवा संकल्प’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या विविध सेवा, दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळाल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात महसूल विभागाकडून ७६ सातबारा उतारे, २५ फेरफार उतारे, १४ आठ-अ उतारे, २७ नमुना ७/१२ व १२/इ उतारे, चार नकाशा नक्कली आणि दोन गावठाण सनदींचे वाटप करण्यात आले. तसेच वनपट्टे केवायसी, महिला शेतकरी योजनेचे लाभ, पाणंद रस्त्यांशी संबंधित कामे आणि ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीची सुविधा देण्यात आली.
तसेच ग्रामपंचायत विभागामार्फत मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्रे व रहिवासी दाखल्यांचे त्वरित वाटप करण्यात आले. कृषी विभागाने महाकृषी व महाविस्तार ॲपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत अनेक प्रश्नांवर जागेवरच मार्गदर्शन व कार्यवाही केली.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन यशस्वी पार पडले. दरम्यान, महसूल नायब तहसीलदार आदेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य दीपक भोईर, विलास रापटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT