सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : गोग्रासवाडी परिसरातील अनधिकृत गोठ्यांमुळे निर्माण झालेली दलदल, अस्वच्छता आणि दुर्गंधीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक वर्षांपासून साचलेल्या शेणामुळे तयार झालेल्या दलदलीत एक व्यक्ती अडकल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
गोग्रासवाडी परिसरात सुरू असलेल्या या गोठ्यात स्वच्छतेचे योग्य निकष पाळले जात नसल्याचा नागरिकांचा दावा आहे. गोठ्याभोवती मोठ्या प्रमाणात शेण साचल्याने दलदल निर्माण झाली असून, परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या परिसराच्या आसपास विविध मंदिरे, तसेच विद्यालय असल्याने विद्यार्थी, भाविक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे दलदलीचा धोका अधिक गंभीर बनला आहे. यापूर्वीही या दलदलीमुळे दुर्घटना घडली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये बैल अंगावर धावून आल्याने घाबरून पळणारी एक शाळकरी मुलगी याच ठिकाणी साचलेल्या शेणाच्या दलदलीत अडकली होती. स्थानिकांनी प्रयत्न करून तिला सुखरूप बाहेर काढले होते. त्या घटनेनंतर काही प्रमाणात साफसफाई करण्यात आली; मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याचा नागरिकांचा दावा आहे.
सध्या पितृपक्षामुळे या परिसरात गाईंना चारा देण्यासाठी भाविकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे दलदलीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गोपालनाला विरोध नसून जनावरांची योग्य देखभाल, स्वच्छता आणि नागरिकांची सुरक्षितता यांची काळजी घेतली जावी, अशी भूमिका स्थानिक नागरिक मनोज घरत यांनी मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.