डोंबिवली, ता. ४ : महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचे योगदान, विचार आणि कार्याचा परिचय करून देणारे ‘महाराष्ट्राची गौरव गाथा’ हे नाट्य-नृत्य सादरीकरण पुन्हा रंगमंचावर येत आहे. १८०३ ते २०२२ या कालखंडातील ३१ महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा वेध या कलाकृतीत घेण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ऑक्टोबरमध्ये कल्याण येथे या कलाकृतीचे प्रयोग होणार आहेत.
तत्त्वज्ञान, राजकारण, शिक्षण, कला-संस्कृती आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना या सादरीकरणातून आदरांजली वाहण्यात आली आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि विचारविश्वाचा बाज जपत साकारलेल्या या कलाकृतीतून प्रेक्षकांना या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कलाकृतीचा पहिला प्रयोग १२ जूनला वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झाला. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा प्रयोग होणार असून शुक्रवारी (ता. ९ ) सायंकाळी ७.३० वाजता कल्याण येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात प्रयोग होणार आहे. या कलाकृतीच्या संशोधन व सर्जनशील टीममध्ये डॉ. तुषार गुहा, गिरीश दळवी, निवेदिता दामले, संगीता सावंत आणि तन्मय सावंत यांचा समावेश आहे. नृत्यदिग्दर्शन डॉ. तुषार गुहा, डॉ. अनोन्ना गुहा, गिरीश दळवी, संगीता सावंत आणि बालकृष्ण सावंत यांनी केले आहे. संगीत संयोजन व ध्वनिमुद्रणाची जबाबदारी तुषार सावंत यांनी सांभाळली आहे
तीन भाषांचा समावेश
मराठी, हिंदी तसेच काही प्रमाणात इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आल्याने विविध भाषिक प्रेक्षकांना हे सादरीकरण समजण्यास सुलभ होणार आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची ओळख करून देतानाच देशभक्ती आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा देण्याचा प्रयत्न या कलाकृतीत करण्यात आला आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.