मुंबई

केअरटेकरचा घरातील ऐवजावर डल्ला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : घरातील मंडळी नोकरीच्या निमित्ताने बाहेर आणि घराची जबाबदारी विश्वासू व्यक्तींच्या हाती... मात्र, याच विश्वासाला तडा देत ठाण्यातील दोन कुटुंबांच्या घरातील सोन्याचे दागिने, हिऱ्यांच्या वस्तू आणि रोकड गायब झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. मानपाड्यात केअरटेकरने प्रियकराच्या मदतीने तीन लाख ६० हजारांचा ऐवज लांबवल्याची तक्रार असून, वर्तकनगरमध्ये घरकाम करणाऱ्या दोन महिलांवर पाच लाख ३० हजारांच्या ऐवजाच्या चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही घटनांमध्ये सुमारे नऊ लाखांचा ऐवज गायब झाला आहे.

मानपाड्यातील ओकवुड अॅक्मेओझोन परिसरात प्रेरणा चिमुरकर आणि त्यांचे पती नोकरीला असल्याने आठ वर्षांच्या मुलीच्या देखभालीसाठी त्यांनी सात महिन्यांपूर्वी शिवानी कनोजिया (१९) हिला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. २८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान १३.५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, १२ ग्रॅमची सोन्याची साखळी आणि ३० हजार रुपये रोख असा ऐवज गायब झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. चौकशीदरम्यान शिवानीने प्रियकर रितीक प्रजापती (२२) याच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. चोरीचा ऐवज रितीककडे दिल्याचेही तिने सांगितले. मात्र, तो वाराणसीला असल्याचे सांगून परतल्यानंतर ऐवज देण्याचे आश्वासन देत राहिला. दरम्यान, शिवानी घरातून निघून गेल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

घरकामगार महिलांवर चोरीचा संशय
वर्तकनगरमध्ये योगिता शेट्ये यांच्या घरातील दागिने टप्प्याटप्प्याने गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या ज्योती टक्के हिने तिची मैत्रीण वनिता सोंडकर हिला कामावर आणले होते. शेट्ये यांच्या म्हणण्यानुसार, १६.७५ ग्रॅमची सोन्याची बांगडी, १५ ग्रॅमचे मंगळसूत्र, हिऱ्यांचे कानातले, सोन्याचे कानातले, स्वारोवस्की पेंडंट आणि सुमारे १० हजार रुपये रोख असा ५ लाख ३० हजारांचा ऐवज गायब झाला. दोन्ही प्रकरणांत पोलिसांकडून चोरीच्या ऐवजासह संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT