राजीनामा झालाच पाहिजे ः हर्षवर्धन सपकाळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहेत, त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे; पण या षड्यंत्राचे मुख्य सूत्रधार रंगा-बिल्ला यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
गांधी जयंतीनिमित्त ऐतिहासिक मणीभवनला महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत बी. एम. संदीप, रेहाना चिस्ती, प्रवक्ते धीरज देशमुख, प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जोजो थॉमस, ब्रिज दत्त, मोनिका जगताप उपस्थित होते. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, गांधी विचार, संविधानाचा विचार पुढे घेऊन जाण्याची आज नितांत गरज आहे. गांधी विचार हाच शिव, शाहू, फुले, आंबेडकर, संत परंपरेचा विचार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार अत्यंत ढिसाळ पद्धतीचा असून, विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलने करूनही त्यात सुधारणा होत नाही. सध्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे. या विद्यार्थ्यांची मागणीही रास्तच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.