मुंबई

सीजेपीचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण

CD

सीजेपीचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण ः शेलार

मुंबई, ता. २ ः मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे आणि निश्चित कार्यपद्धतीनुसार जाहीर केली आहे. त्यामुळे एसआयआरच्या नावाखाली आंदोलन करण्याला कोणतेही घटनात्मक अधिष्ठान नाही. सीजेपीचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण आहे, अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी केली. भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील आपल्या भाषणात घटनात्मक मार्गांचे महत्त्व अधोरेखित केले होते. घटनात्मक मार्ग उपलब्ध असताना असंवैधानिक मार्गांचा अवलंब करणे म्हणजे अराजकतेचे व्याकरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आजच्या परिस्थितीत बाबासाहेबांच्या या विचारांची आठवण होते, असेही शेलार यांनी सांगितले. एसआयआर प्रक्रियेबाबत बोलताना ॲड. शेलार म्हणाले, एखाद्या प्रक्रियेबाबत आक्षेप असेल, तर तो घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने मांडता येतो. निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडण्याची संधी आहे. न्यायालयीन मार्गही उपलब्ध आहे; मात्र या सर्व प्रक्रिया उपलब्ध असताना आंदोलनाच्या माध्यमातून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. लाखो प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असेही शेलार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

CNG गॅस भरताना टाकीचा स्फोट, कारच्या चिंधड्या; इतर गाड्यांचेही नुकसान, घटनेचा VIDEO VIRAL

Vijay Mallya : मल्ल्याने म्हटलं बँकांनी जास्त पैसे वसूल केले, पण SBIच्या प्रतिज्ञापत्रात वेगळाच दावा; ८,७५२ कोटी बाकी, पुढे काय होणार?

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात शेतकऱ्यांकडून पालकमंत्र्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

‘Limboti Dam Wate: लिंबोटी’त ३५ टक्के साठा, दोन दिवसांआडचा पुरवठा ४ दिवसांवर येणार; कंधार शहराला तीन महिनेच पुरणार पाणी!

SCROLL FOR NEXT