एसईझेडचा गुंता सुटला नाही, तर ‘तिसरी मुंबई’ कशासाठी?
आधी जमिनीवरील नोंदी हटवा; त्यानंतरच नव्या प्रकल्पाची चर्चा करा
उरण, ता. २ (वार्ताहर ) : प्रचंड जनक्षोभामुळे एसईझेडचा प्रकल्प रद्द झाला असला, तरी त्याचे सावट अद्याप शेतकऱ्यांच्या जमिनीवर कायम असल्याची तक्रार आहे. वर्षानुवर्षे जमिनी अडकून पडल्या असून, सातबारा उताऱ्यावरील नोंदी आणि बोजे कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अशातच याच भागात ‘तिसरी मुंबई’सारख्या नव्या प्रकल्पाची चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
‘एसईझेड गेला, मग आमच्या जमिनीवरील अडचणी कधी दूर होणार,’ असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. आधीच्या प्रकल्पासाठी जमीन संपादित किंवा आरक्षित करण्यात आली होती, मात्र प्रकल्पाचे स्वरूप बदलल्यानंतरही जमिनीच्या नोंदी कायम राहिल्याने जमीन व्यवहार आणि वापराबाबत अडचणी निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नव्या नवनगर अथवा ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे. आधी एसईझेडच्या नावाखाली अडकलेल्या जमिनींचा प्रश्न सोडवून सातबारा कोरा करावा. त्यानंतरच नव्या प्रकल्पासाठी जमीन देण्याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
एसईझेडग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ नोंद दुरुस्तीपुरता मर्यादित नसून जमिनीवरील हक्क आणि भविष्यातील वापराबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नव्या विकास आराखड्यांची चर्चा करण्यापूर्वी जुन्या प्रकल्पाचा गुंता सोडवावा, अशी मागणी जोर धरत आहे.
सातबारा कोरा करण्याची मागणी
एसईझेड प्रकल्प रद्द झाल्यानंतरही जमिनीवरील नोंदी कायम असल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आधी सातबारा कोरा करा, मगच नव्या प्रकल्पाची स्वप्ने दाखवा, अशी भूमिका शेतकऱ्यांकडून मांडली जात आहे.
कोट
शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा घाट घातला असून, शासन या ना त्या मार्गाने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमचा त्याला कायमचा विरोध राहील.
- तुषार पाटील, एस ई झेड बाधित शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.