मुंबई

दुभाजकांपासून मेट्रो खांबाखाली वृक्षलागवड

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : एकीकडे ठाणे शहरात पावसाळ्याच्या कालावधीत अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील वृक्षसंपदेलाही मोठा फटका बसला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, ज्या जागेवरील झाडे पडली, त्या ठिकाणी झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येत आहे. यामुळे शहरातील हरित संपदा धोक्यात आली आहे. याबाबत पर्यावरणतज्ज्ञांनी टीकेची झोड उठविल्यानंतर आता, पालिका प्रशासनाने एक लाख देशी प्रजातीचे वृक्षलागवड करण्याची निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे शहराच्या विकासाचा वेग वाढला असला, तरी या विकासाची किंमत शहरातील हिरवाईला मोजावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिंग मेट्रो, मेट्रो, फ्री वे यांसह विविध महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष बाधित होणार आहेत. त्यामुळे आधीच वाढत्या प्रदूषणाचा सामना करणाऱ्या ठाणे शहरातील हरित पट्टा आणखी आक्रसण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने एक लाख वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.

विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू नये, यासाठी उपलब्ध जागांचा शोध घेऊन त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्यानुसार माजिवडा नाका ते नाशिक महामार्ग परिसरात वृक्षलागवड केली जाणार आहे. त्याचबरोबर मेट्रो मार्गासाठी उभारण्यात आलेल्या पिलरखालील उपलब्ध जागा, रस्त्यांचे दुभाजक, महापालिकेच्या मोकळ्या जागा यांचाही वृक्षलागवडीसाठी वापर केला जाणार आहे. महापालिकेची आरोग्य केंद्रे, शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे.

देखभालीचे आव्हान
लागवडीनंतर ही झाडे जगविण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर राहणार आहे. शहरात यापूर्वीही विविध मोहिमांतून वृक्षलागवड करण्यात आली आहे, मात्र अनेक ठिकाणी देखभालीअभावी रोपे नष्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे यंदाची मोहीम केवळ कागदावर न राहता प्रत्येक रोपाच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नियमित पाणीपुरवठा करणे आणि त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक ठरणार आहे.

देशी वृक्षांना प्राधान्य
या मोहिमेत केवळ शोभेची झाडे न लावता स्थानिक पर्यावरणाशी जुळणाऱ्या देशी वृक्षप्रजातींना प्राधान्य देण्यात येणार आहे. वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब यांसह विविध देशी प्रजातींची लागवड केली जाणार आहे. स्थानिक जैवविविधतेला पूरक ठरणारी आणि दीर्घकाळ टिकणारी झाडे शहरात वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT