मुंबई

भिवंडी महामार्गावर ट्रक सह एक कोटीचा गुटखा जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

CD

भिवंडी महामार्गावर ट्रकसह एक कोटीचा गुटखा जप्त
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) ः मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकवर ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत ट्रकसह एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. मध्य प्रदेशातील इंदोर येथून मुंबईच्या दिशेने मुंबई-नाशिक महामार्गावरून एका ट्रकमधून एक लाख कोटींचा गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब एडके यांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवई नाका येथे शुक्रवारी पाळत ठेवली. संशयित ट्रक आला असता पोलिस पथकाने विचारपूस केली, तेव्हा ट्रकचा चालक पसार झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकची तपासणी केली असता, गोणीमध्ये ५५ लाख आठ हजार रुपयांचा २७,५४० पॅकेटमधील राजनिवास गुटखा आणि २६ लाख ४३ हजार ८४० रुपयांचा झेड वन सुगंधित तंबाखू असा एकूण ८१ लाख ५१ हजार ८४० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश ढाणे यांच्या नेतृत्वाखालील अन्न सुरक्षा अधिकारी कस्तुरी चिपळूणकर, अरविंद कांडेलकर यांना पाचारण केले. त्यांनी पंचनामा करून हा मुद्देमाल व ट्रक असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमला जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT