पूर्णेकर हत्याप्रकरण
़़़़़़़़़़़़
आणखी दोघांना अटक
८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी वागळे इस्टेट गुन्हे शाखेने कर्नाळा अभयारण्य परिसरात लपून बसलेल्या निखिल यादव आणि निकेश पवार यांना शुक्रवारी (ता. २) पहाटे अटक केली. त्यांना न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
हत्येप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सतीश उर्फ पप्या शिंदेला यापूर्वीच अटक केली आहे, तर दोन दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. त्यानंतर आता निखिल यादव आणि निकेश पवार यांना अटक करण्यात आली आहे.
८ ते १० जणांची चौकशी
पूर्णेकर हत्येचा तपास सर्व बाजूंनी करण्यात येत आहे. आतापर्यंत आठ ते दहा जणांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले आहे. यामध्ये मिरा रोड येथील तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तसेच बांधकाम व्यावसायिक मेहता यांचाही समावेश आहे. या गुन्ह्यात ज्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे, त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी
तपासासाठी पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. घटनास्थळ, परिसरातील ये-जा करणारे मार्ग, आरोपींनी वापरलेल्या दुचाकी आढळलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. आणखी काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपींनी वापरलेली हत्यारे, हत्येपूर्वी आरोपींची कुठे बैठक झाली होती का, त्यांना कोणी मदत किंवा सहकार्य केले होते का, तसेच या प्रकरणाचा कोणताही राजकीय संबंध आहे का, या सर्व बाबींच्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.