धारावीकरांमध्ये विश्वासनिर्मिती होईल!
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये नागरिकांना केवळ पुनर्निर्माण प्रकल्पाचे आराखडे पाहायला मिळणार नाहीत, तर त्यांच्या भविष्यातील घराचा, परिसराचा आणि कामाच्या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यामुळे अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून धारावी पुनर्विकासाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसित नागरिकांना मिळणारी घरे, उद्योगांसाठीची जागा तसेच भविष्यातील सामाजिक पायाभूत सुविधांचे प्रत्यक्ष आणि डिजिटल दर्शन घडविणाऱ्या अत्याधुनिक ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. पीएमजीपी कॉलनीत उभारलेल्या या केंद्राची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर ते एक मोठे आर्थिक इंजिन आहे. येथील लघु-मध्यम उद्योगांमधून मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या उद्योगांचा सन्मान राखत त्यांना अधिक चांगली आणि नियोजित कार्यस्थळे उपलब्ध करून देण्याचा विचार पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे. धारावीची विद्यमान सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपत तिचे सर्वंकष नागरी परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे.’’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेल्या नागरी परिवर्तनाचे हे आदर्श उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
...
यांची उपस्थिती
या वेळी पालिका आयुक्त अश्विनी भिडे, धारावी पुनर्विकास प्रकल्प व एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सचिव विपीन पालीवाल, अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सरदाना, अदाणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदाणी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.