मुंबई

‘राजकीय संघर्ष जीवघेणा होता कामा नये’ ः नाईक

CD

राजकीय संघर्ष जीवघेणा
होता कामा नये ः नाईक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : राजकीय संघर्ष हा राजकीय पातळीवरच असायला हवा. तो जीव घेणारा संघर्ष होता कामा नये,’ असे मत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. तसेच या हत्येमागे कोणी सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले, तर त्यालाही कायद्याच्या कक्षेत आणून शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. केवळ कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे दुःख कमी होणार नाही. या कुटुंबाला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व शक्यता तपासून हत्येमागील नेमके सत्य उजेडात आणावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रदीप पूर्णेकर कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते, यापेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. त्यांची हत्या ही गंभीर घटना असून, कुटुंबीयांनी तपासासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यांचीही गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे तपासातून हत्येमागील खरे आरोपी आणि सूत्रधार समोर येतील आणि दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल, असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

वरच्या दरबारात कोणी सुटत नाही!
पूर्णेकर हत्येमागे विविध कारणांची चर्चा होत असून, विकासकामांशी संबंधित वादापासून ते ड्रग्जशी संबंधित कारणांपर्यंत वेगवेगळे ‘अँगल’ समोर येत आहेत. या सर्व शक्यतांचा तपास करणे आवश्यक आहे. नेमके कारण काय, हे पोलिस तपासातूनच स्पष्ट होईल, असे नाईक म्हणाले. शेवटी सत्य कधी ना कधी समोर येते. वरच्या दरबारात कोणी सुटत नाही; सजा मिळेल,’ असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
़़़़़़़़़़़़़़़़़़़

एसआयटीकडून पुरावे संकलित
ठाणे, ता. २ : पूर्णेकर यांच्या हत्येनंतर तीन दिवसांपासून बंद असलेले त्यांचे कार्यालय शुक्रवारी एसआयटी पथकाच्या उपस्थितीत उघडण्यात आले. गुरुवारी एसआयटी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा पथकाने कार्यालयाची तपासणी करून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे संकलित केले.
कार्यालयात हत्येनंतर रक्ताचे डाग तसेच अन्य खुणा आढळल्या. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करताना गोळीबारात वापरण्यात आलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आणि इतर महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पुराव्यांच्या आधारे हत्येचा तपास पुढे नेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT