‘टेब ट्रीटमेंट’कडून सांधेदुखीवर संशोधनाधारित आयुर्वेद उपचार
पुणे, ता. २ : सांधेदुखी, स्नायू आणि मणक्यांच्या आजारांच्या मूळ कारणांचा शोध घेऊन त्यावर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये संशोधनाधारित आयुर्वेद उपचार केले जात आहेत. पुणे आणि नागपूरमध्ये गेल्या अनेक दशकांपासून ही रुग्णसेवा सुरू असल्याची माहिती क्लिनिकतर्फे देण्यात आली.
पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावर ३९ वर्षे, तर नागपूरमध्ये २९ वर्षांपासून हे क्लिनिक कार्यरत आहे. येथे गुडघे व सांध्यांची झीज, संधिवात, आमवात, ऑस्टिओआर्थ्रायटिस, अँकिलोझिंग स्पाँडिलायटिस, हिप जॉइंट नेक्रोसिस, लंबर स्पाँडिलायटिस, लिगामेंट दुखापत, फ्रोजन शोल्डर, डिस्क बल्ज आणि कार्टिलेज लॉस यांवर उपचार होतात. रुग्णाची प्रकृती, आजाराचा इतिहास आणि वैद्यकीय तपासण्यांनुसार स्वतंत्र औषधयोजना केली जाते.
क्लिनिकच्या माहितीनुसार, उपचारपद्धती गेल्या ३९ वर्षांच्या संशोधनातून विकसित झाली आहे. येथील औषधे वनस्पतिजन्य असून, त्यात स्टिरॉइड, पेनकिलर, कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा धातूजन्य घटकांचा वापर केला जात नाही. निदान पूर्ण झाल्यानंतरच रुग्णाच्या गरजेनुसार औषधे तयार केली जातात. उपचार ‘ओपीडी’ पद्धतीने होत असल्याने रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसते. उपचार सुरू असतानाही नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा दैनंदिन कामकाज सुरू ठेवता येते. अनुभवी व पात्र डॉक्टर तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार सेवा सातत्याने दिली जात आहे. रविवारसह आठवडाभर क्लिनिकमध्ये उपचार सुविधा उपलब्ध असून, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील रुग्ण त्याचा लाभ घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.