तलवाडा-विक्रमगड-पाली रस्ता खड्डामय
दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : विक्रमगड-तलवाडा-पाली मार्गावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराने तातडीने दुरुस्ती करावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम उपविभाग, विक्रमगड यांनी केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत स्थानिक नागरिक, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.
खांडाळा-तिलोंडा-कासा, तलवाडा-विक्रमगड-पाली या रस्त्याचे काम एचएएम योजनेअंतर्गत करण्यात आले असून, संबंधित कंपनीकडे रस्त्याच्या सर्व देखभालीची जबाबदारी आहे. मात्र विक्रमगड, तलवाडा ते पाली या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटनेने २३ सप्टेंबरला पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनीही तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. दुरुस्ती न झाल्यास ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. विक्रमगड-तलवाडा मार्गावरील खड्डे तातडीने भरून रस्ता सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, विक्रमगड यांनी संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.